Wednesday , May 23 2018
Home / Places / Mumbai / म.रे.
म.रे.

म.रे.

३१ डिसेंबरचा ह्यांगओवर उतरला न्हवता म्हणून कंपनीने १ जानेवारीला सुट्टी दिलेली पण रेल्वे प्रशासनामुळे अजून एक सुट्टी मिळाली ना भाऊ ! पण बाकीच्यांना

झाल अस की…

तसा पण जायचा कंटाळा आलेला पण १ची सुट्टी मिळाल्याने आणि मजबूत पार्टी झाल्यामुळे जीव शांत झाला होता. मस्तपैकी आराम करून लोळून लोळून घालवलेला.

आज 2 ज्याण. उठावस वाटत न्हव्हत. पण जायचं तर होताच कसतरी तैयारी करून जड पावलांनी स्टेशन कडे रस्ता वळवला. नेहमीसारखा दिवस आणि परत नवीन वर्षात नेहमीची गर्दी छ्या!

मग पुढे रिक्षातून जाताना कानावर आल म.रे. चा प्रॉब्लेम आहे. म्हटलं आहे का हे अजून. काहीच नवीन नाही. अगोदर कुर्ला पर्यन्त जाव मग परत बस ने जाण्याचं किंवा गजानन ला आवाज देण्याचा विचार करू लागलो. सानपाडा स्टेशनवर बघतो तर काय ही भली मोठी गर्दी. हार्बर चालू होती पण सेंट्रल बंद होती. तोपर्यंत अनेक अफवा पसरू लागल्या. दिव्यानंतर डोंबिवली आणि कोपर पेटल होत. आणि बराच काही. कल्याणला ऑफिसला जायला काही मिळणार नाही आज म्हणून परत फिरलो तर घरून फोन अंधेरीला काकांकडे जायचं होत. म्हटलं तिकडे काही प्रॉब्लेम नाही जाऊया मग.

आज सुट्टी तर झाली आहे चला जाऊया आरामात. मग विचार करत मागे फिरलो एस.टी. पकडायच ठरवलं आणि वाट बघत उभा राहिलो तर काय आश्चर्य कुर्ला ची एसटी मिळाली की. जागा मिळाली अन शांतपणे कधी पर्यन्त पोहचू आणि किती वेळ हा राडा राहील याचा विचार करत राहिलो. आजूबाजूला प्रवाश्यांचा हाच ‘आजच्या ठळक बातम्या विषय’ होता. किती शिव्या किती शाप पण थोडे प्रवाश्यांना आणि थोडे ट्रेन वाल्यांना कोणालाही झुकत माप नाही.

कस बस चेंबुर नका पोहचलो तिथून रिक्शा पकडून घाटकोपर. तिकडे मेट्रो आहे ना. चला ह्या निमित्ताने मेट्रो ही पाहू म्हटलं. आणि जस स्टेशनमधून मेट्रोच्या आवारात गेलो तस नवीन जग भासू लागलं. काय तो चकचकाट. कुठेही घई नाही की धक्काबुक्की नाही. मानस मुंबईतलीच जी ट्रेन मधुनही प्रवास करत असतील पण बघा ना किती वेगळी वागत होती. जर चांगलं मिळाली की मानस पण चांगलं वागतात ना. असो.

त्या वेगळ्या जगात बार वाटलं. रिटर्न तिकिटच काढलना राव मग. मग एयरपोर्ट वर करतात तसं बॅग स्क्यानिंग आणि बाहेरगावच्या स्टेशन वर करतात तस टोकन शो ऑफ. सरकणारे जीने सगळ कस शांतपणे. बर वाटलं. दरवाज्यासमोर रांगेने उभी  राहणारी पाब्ल्लिक. एसी वाला डब्बा सॉरी कंपार्टमेंट. मस्त १५ मिंटात अंधेरी. तिथून उतरून पत्ता विचारात चालत चालत काकांकडे. टीव्ही वर बातम्या पहिल्या कळलं नाही पण मुंबईत काय काय झाल येवढ्या वेळात. काकींच एकाच तू थांब आज उद्या जा. ह्या ट्रेन वाल्यांचा आणि प्रवाश्यांचा काही नेम नाही. पण माला मनातून वाटत होत. की हे कधीतरी होणार होतच. आज झाल त्यात काय. त्रास तर प्रवाश्यांनाच झाला पण प्रशासनाला कळण गरजेचं होतच की. नुकसान सर्वांच झाल पण आता मिळणारी आश्वासणे आणि उपाययोजना खूप अगोदर व्हायला हव्या होत्या. असो…

संध्याकाळी निघालो. परत त्या मेट्रोच्या आभासी दुंनियेतून आपली लोकल कधी होईल अशी हे ‘दिवा’स्वप्न रंगवत घाटकोपर ला आलो. ट्रेन सुरू झाल्या होता अस कळलं. मग आलो स्टेशन वर तर तुडुंब भरलेले काय प्रकार असतो ते समझले. मग वस्तु, मोबाइल आणि पाकीट ब्यागेत व्यवस्थित नीट बसवून. होऊ घातलेल्या डोंबर्‍याच्या खेळकडे लक्ष देऊन राहिलो. एक तास ट्रेन आली न्हवती. बस कुर्ला पर्यन्त पोहचू दे धडधाकट देवा महाराजा. ट्रेन आली तीपण अपेक्षेप्रमाणे भरलेली. थोडे जान उतरले असतील तोच जी वितभर जागा झाली त्यावर हक्क संगत दहबरा लोकांनी आतमध्ये उद्या मारल्या असतील त्यात मी एक होतो.

पाठच्या रेट्याने म्हणा हव तर मी ट्रेन मध्ये दाखल झालो होतो. आता आम्ही सर्वदाबबयतले आमचे न्हावतो सर्वांनी एकमेकांना दत्तक घेतले होते. जिकडे ट्रेन हलेल तसे आम्ही  त्या त्या कोपर्‍याला झुलत होतो. कुर्ल्यापर्यंत जवळ जवळ प्रत्येकाची ट्रेन ला लाखोली वाहून झाली होती, पण उद्या सगळं परत व्यवस्थित होईल असा मुंबईवाला आशावाद ही होताच. कुरल्याला आल्यावर अलगद बाहेर ढकललेलो गेलो.

हार्बरच्या प्ल्याटफोर्म वर आलो तर कित्येक दशक तिथे ट्रेन आली न्हावती आणि आता उद्घाटन होणार आहे या आविर्भावात माणसं जमा होती. गपचूप बस स्टॉप कडे वळलो. तर तिकडे माझ्यासारखी माणसे अगोदरच बसेस शोधत होती. चेंबुर नाक्यावर उतरून पुढे एसटी ने पनवेल साईड ला जाण्याचा सगळ्यांचा माझ्यासारखाच मानस होता.

नाक्याला जाणार्‍या गाडीचा बोर्ड लागताच कंडक्टर आणि ड्रायवर गाडीत बसायच्या आताच गाडी फुलप्याक झाली. त्यामुळे कंडक्टर म्हणजेच मास्तर ची झाली ती दमछाक. कोणाला उतरण्याच्या स्टॉप चे नाव माहीत नाही, कोणाकडे सुट्टे पैसेच नाहीत (मैन प्रॉब्लेम), कोण स्त्रियांच्या शिटवर बसलेला त्याला स्त्रियांकडून मिळत असलेल्या शिव्या, कोण बाहेर पहिल्यांदाच मुंबई बघर असल्यासारखा बाहेर बघत होता त्यामुळे पाठच्यांची झालेली गर्दी आणि पुढे थोडीशी असलेली मोकळी जागा जी त्यावेळी खूप मोठी असल्यासारखी भासत होती मग परत बाकीच्यांनी दिलेल्या शिव्या. वातावरण कस गजबजून गेल होत. चेंबुर नाक्याला जवळ जवळ बस खाली झाली आणि आता आम्ही वाट बघत होतो एसटी ची.

येणार्‍या बहुतेक गद्य भरून येत होत्या आणि जिडे दरवाज्यावर एक दोन जागा दिसत होत्या तिथे अगोदरच हट्टीकट्टी लोक धक्काबुक्की करून जागा पकडत होती.

त्याच वेळी रिक्शावाले आणि ट्याक्षीवाले लांबच भद मिळेल म्हणून कधी न्हावे ते स्वतः हून थांबताना दिसले. पण काही कपल्स किंवा वयोवृद्ध सोडले तर कोणीही लक्ष दिल नाही.

शेवटी मिळाली एकदाची दादर पनवेल. एक कोपरा पकडून आता वाट बघत होतो ती घर येण्याची. वाशी पुलावर प्रचंड ट्रॅफिक. तो पर्यन्त घरून फोन यायला सुरवात कुठे पोहचलास, किती वेळ लागेल, लवकर ये पण सांभाळून ये वगेरे वगेरे… अर्धा वेळ फोनवर वाटसप जीआरपीएस वेर मध्य रेल्वे वर येणारे जोकेस फॉरवर्ड, करत होतो तर काही ठिकाणी रेल्वेला शिव्या, तर काही ठिकाणी कोण कुठे आहे हे जाणून घेऊन हार्बर ची दशा संगत होतो. रास्ता सांगत होतो.

पाय दुखायला लागलेले. गाडीतून उतरून रिक्शा पकडली आणि तडक घरी. भुखी लागली होती. कधी येकदा घरी पोहचतोय अस झालेल.

आजचा दिवस संपत आला होता. सुट्टी मिळूनही रोजच्या टाईमला जरा लेटच मी घरी पोहचत होतो. उद्याचा दिवस कसं जाईल काय माहीते पण येईल आणि जाईल येवढ नक्की…

शैलेश (नवी मुंबई)

About admin