Wednesday , May 23 2018
Home / Places / Thane / Haji Malang
Haji Malang

Haji Malang

Long time has passed in between the day I had gone to this place and today when I am about to bring that adventure before you, as I started seeing the flashback after going through the photographs.

We headed towards Kalyan where we can catch the ST bus to reach this spot. The plans for this outing was being prepared much earlier, but due to our understanding about the spot being at a good height and requiring a lot of walking it was delayed. There is a dargah and a fort at the top of the hill.

We headed towards Kalyan by train.

मराठीत वाचा

तसा बराच कालावधी लोटून गेला आहे तिकडे जाऊन. आज संग्रह बघताना हा प्रवास दिसून आला. चला आज या प्रवासाविषयी सांगतो.

तसा तर बरेचदा चर्चा झालेली की हाजी मलंग ला जाऊया. मग एके दिवशी ठरवलं आणि निघालो कल्याणच्या दिशेने. हो कल्याण वरुन एसटी सुटते हाजी मलंगला. तिकडे दर्गा आणि गड आहे. म्हटलं बघूया कस जमत ते कारण आस ऐकलेल की खूप फिरून फिरून चालायच आहे.

ट्रेन ने कल्याण स्टेशन ला उतरलो.

1

After coming out of the station the first thing to do was a good breakfast, as we were unsure of availability of food during the journey and also couldn’t eat much later as we had to walk a lot. We bought a mineral water bottle as we had not brought water with us and water being more important than food during a strenuous outing. We went towards the ST depot which was just in the opposite. We asked two three people about the bus for Haji Malang. After a long time one bus arrived but the crowd had also swelled. We somehow got into that bus and felt like an achievement, even though we couldn’t get a seat initially and had to stand.

मराठीत वाचा

पहिला मजबूत भरपेट नाश्ता केला कारण नंतर खायला मिळेल की नाही माहीत न्हवत आणि जरी मिळालं तरी चालायच असल्याने कमीच खाव लागलं असत. पाणी आणायला विसरलो असल्याने एक पाण्याची बोटल घेतली. जेवण नसल तरी चालत पण पाणी जरूरी आहे ना. बाजूलाच एसटी डेपो होता. २/३ जणांना विचारुण खात्री करून घेतली की हाजी मलंग ला जाणारी गाडी कोठून सुटते ते. बराच वेळ गाडी आलीच नाही आणि जाणार्‍यांची संख्या मात्र वाढत होती. एकदाची गाडी आली आणि आम्हाला बर्‍यापैकी उभा राहायला का होईना पण जागा मिळाली.

गाडीत डुलत डुलत आजूबाजूचा परिसर न्याहाळत आम्ही जात होतो. मग मधेच बसायला जागा मिळाली.

2

The bus went on giving us a jolts struggling over through the potholed roads. We were looking outside the bus ready with our cameras and ready to capture as soon as we got a seat.

Most of the time the shots went blurred due to the erratic ride, but a few came out better.

मराठीत वाचा

मग काही क्षणचित्रे क्यामेरा मध्ये बांधीस्त करण्याचा प्रयत्न केला. बहुतेक वेळा गाडी हालत असल्याने फोटो ब्लर आले पण काही आले ठीकठाक.

3

4

After a long time Haji Malang peak could be seen.

While we were looking at that the bus moved into the depot and the passengers at the depot waiting for the bus suddenly got into their feet and gathered to catch the bus not yet stopped. This created a sort of commotion as those inside the bus were struggling to get down as they were pushed by the boarding passengers trying to get a seat. Some were even claiming a seat by placing their bags on seat through the windows. We started to get an idea about the situation of our return journey, but left it saying let’s face it as it comes, and we got down.

मराठीत वाचा

बराच वेळ गेला आणि हाजी मलंगचा डोंगर दिसू लागला.

ते पाहत असतानाच गाडी डेपोमध्ये पोहचली आणि गाडी पकडण्यासाठी आलेल्या प्रवाशांची धावपळ उडाली. काहीजण अगोदर जागा मिळावी म्हणून गाडीत चढण्याच्या प्रयत्नांत उतरणार्‍यांना धडपणे उतरू देत न्हवते तर बर्‍याच जणांनी खिडकीतून समान गाडीतल्या शिटवर टाकून अगोदरच आपला हक्क सांगितला होता. येताना कस होईल त्याची झलक आम्हाला मिळाली. पण पुढचं पुढे बघू असा विचार करून आम्ही खाली उतरलो.

5

From a distance zoom we could see the dargah and temple.

मराठीत वाचा

दूरवर झूम केल्यावर आम्हाला दर्गा आणि मंदिर दिसलं.

6

We were unfamiliar with the pathway which took many twists and turns. We started on. It was a summer day and almost reaching noon.

मराठीत वाचा

पायवाट नीटशी कळत न्हवती. बरीची वळण घेत ती जात होती. एकदाची सुरवात जाहली. उन्हाळा आणि उन्ह थोडी मध्यान्हकडे झुकू लागली होती त्यामुळे थोड्या वेळातच दुपार भोवू लागली होती.

8The water we had bought was almost a life saver. We were in a situation where again and again in a few minutes we were having a sip of water, having a scarf on our head to protect us from the harsh sun and that same scarf slipping on our face.

मराठीत वाचा

पाणी होत त्यामुळे बचावलोच. मध्ये मध्ये पाण्याचे घोट पिणारे, गळ्यात डुलणारे क्यामेरे असलेले, डोक्यावर मोठा रुमाल गुंडाळलेले आणि तोच रुमाल तोंडावर आलेले असा थोड्या वेळात आमचा वेश झाला होता.

7

Whether seeing us in such a situation or being the guards of that place a group of monkey came in front of us. We managed to ignore and pass them without disturbing them. The climb was not ending. Although we had gone through such experience of climbing before but this seemed much more strenuous.

मराठीत वाचा

हा वेश बघून की काय किंवा नेहमीचे राखणदार असावेत जणू ह्या आविर्भावात की काय पण समोर वानरांची टोळी आली. सुम्मपणे बाजूने गेलो. अजिबात त्यांच्या नजरेत भरणार नाही असे.

9

The climb was not ending. Although we had gone through such experience of climbing before but this seemed much more strenuous.

मराठीत वाचा

समोरचा प्रवास संपत न्हवता. खरतर बर्‍याच लांबचे प्रवास केलेले यापूर्वीहि पण हा नागमोडी प्रवास त्रासदायक वाटत होता.

13

Many people had contributed for new steps to climb and many of the steps seemed quite old.

मराठीत वाचा

लोकांनी खूप सहकार्य केल्याच दिसत होत कारण बर्‍याच पायर्‍या ह्या लोकांनी अर्पण केल्या होत्या आणि बर्‍याच जुनयही होत्या.

10

At every corner there was a small food stall which looked quite unkempt. We had a cold drink which relived us a bit from the effect of hot sun. Such stalls seemed to be at most of the corners on the way. The products seemed to be similar in every stall but still there were many stalls close to each other.

मराठीत वाचा

मध्ये मध्ये छोटीशी टपरीवजा हॉटेल्स होती. तिथे एक दोन ठिकाणी थांबून शीत पेयं घेतली. जीव थंड झाला.प्रत्येक कोपर्‍यावर सारख्याच धाटणीची टपरीवजा हॉटेल्स आणि सारखच सामान तरीही प्रत्येक कोपर्‍यावर. मग ते अगदी जवळ का असेना.

11

The chanting of Allah was falling on our ears. We were again getting the stamina to keep climbing. Soon we reached ‘Pahili Salami’.

मराठीत वाचा

कानावर अल्लाच नामस्मरन पडत होत. मन स्फूर्ति घेऊन परत धीर घेऊन चालायला बळ मिळत होत. आणि आस करता करता पहिली सलामी आली.

12

Not knowing what is Pahili Salami we took it as a first conquered place. Of course there was nothing like second or last Salami, but anyway we went on.

After a while we reached near the dargah and the atmosphere seemed to calm and pleasant.

We entered the dargah which reminded us of Mumbai’s Haji Ali. Faith attracts every devotee irrespective of religion. We clicked a few photographs by taking permission.

मराठीत वाचा

सलामी म्हणजे काय ते कळलं नाही पण पहिला मुक्काम असावा आस वाटलं. पण दुसरी किंवा शेवटची सलामी काही मिळाली न्हवती. असो.

थोड्याच वेळात आम्ही दरग्या जवळ पोहचलो आणि वातावरण भरून गेलेलं पहिलं. सगळी कडे प्रसन्नदायक वातावरण होत.

आणि आम्ही दर्ग्यात प्रवेश केला. मुंबईतल्या हाजी अलीची आठवण आली. धर्म कोणताही असो श्रद्धेच बळ प्रत्येक श्रद्धाळूला आकर्षित करते. तेथील उपस्थित असलेल्या अधिकार्‍यांच्या परवानगीने थोडे फोटो काढले.

15

16

17

18

Looking down the hill showed us how much we had climbed up but the view looked beautiful.

मराठीत वाचा

बाहेर कथड्यावरून खाली पाहताच बरीच पायपिट केली होती याचा अनुभव आला. पण ते दृश्य सुंदर होत.

19

A telescope was placed at the top to have a look at long distance.

मराठीत वाचा

आणि बाजूलाच दुर्बिणीमधून दूरवर पाहण्याची सोय केली होती. माफक फी होती. जरी उन्हाळा असला आणि परिसरात हिरवेपणा कमी असला तरीपण विहंगम निसर्ग पाहून मन प्रफुल्लित झाले.

20

Nearby we saw a group of monkey playing mischievously among themselves.

मराठीत वाचा

तिथेच बाजूला माकडांच पाठक दिसलं. आपल्याच नादात झाडांवर त्यांची मस्ती चालू होती.

21

We walked further. Worn out due to heat we felt like our body burning. The trees nearby had also withered.

मराठीत वाचा

पुढे निघालो. आता थकलो होतो. उन्हाच्या झळा अंग जाळत होत्या. आजूबाजूची झाडेही त्यामुळेच की काय पानझडी झालेली होती.

22

After walking further we heard the temple bells. We saw the temple earlier viewed from below. The saffron flags were flapping and we went near the temple. The temple in the afternoon sun looked calm and the priests reciting the mantras tuned with the bells our eyes closed and we felt like being near the almighty.

मराठीत वाचा

अजून थोडी पायपिट केल्यावर घंटानाद ऐकू येऊ लागला. खालून बघितलेल मंदिर दिसू लागलं. भगवे झेंडे फडफडताना दिसत होते आणि आम्ही तिकडे चालत जात होतो. साधस मंदिर दुपार असल्यामुळे असलेली शांतता आणि मधेच पुजार्‍याचा होणारा मंत्रोच्चाराचा स्वर जेंव्हा घंटेच्या तालात मिसळत होता तेंव्हा आपोआप डोळे बंद होऊन परमानंदच स्मरण केल गेल.

23

Inside the temple was a statue of a Devi, and pictures of gods. In front of the Devi was a set of 10 faces made where only the eyes could be seen prominently. The historically decorated Mata looked happy in that environment.

मराठीत वाचा

गाभार्यात देवीच्या मूर्तीसोबत बरीच तसबिरी होत्या. मूर्तीसमोर १० मुखवटे होते. त्यामध्ये डोळे प्रामुख्याने दिसत होते. पारंपरिक साज ल्यायलेली माता भगव्या वातावरणात आनंदमयी भासत होती.

24

My sight went towards the photo of Ananth Dighe on the wall. Most probably he has a good contribution towards this temple.

Spending sometime there we continued our journey realizing that there is still one more set of steps we have to climb. The peak could be easily seen.

मराठीत वाचा

तिथेच भिंतीवर माझ लक्ष वेधल ते अनंत दिघे यांच्या फोटोकडे. जरूर या लोकनेत्याने येथील मंदिर उभारणीत मोलाचा वाटा उचलला असेल.

थोडा वेळ तेथे विश्रांति घेऊन बाहेर आलो तर कळलं की पुढे अजून टप्पा बाकी आहे. गड दिसत होता.

25

But now our energy was almost completely drained and it was also getting late. We were also not sure about the timings of the last bus towards Kalyan. We reverted back and slowly and carefully we started going down.

मराठीत वाचा

पण आता तेवढे त्राण शिल्लक न्हवते कारण परतपान जायचं होत आणि उशीर झाला तर शेवटची गाडी कधी असेल ते माहीत न्हवत. मग परत हळूहळू संथ गतीने थांबून थांबून उतारू लागलो.

26

After coming down we finally got into an ST and found a seat at the back.

We felt calm as the chanting of Allah and reciting of Mantras still sounded in our ears.

मराठीत वाचा

आता खाली येऊन मिळाली एकदाची एसटी आणि शेवटच्या टप्प्यात बसायला जागाही.

शांत वाटत होत. अल्लाच नामस्मरन आणि मंत्रोच्चार यांचा एकजिनसी आवाज घुमट होता.

27

About admin